माझे छंद
माझे नाव तेजश्री.
माझे शिक्षण B.Sc.Electronics झाले आहे. माझे छंद.
- शिवणकला
- पाककला
- सजावट
शिवणकला
यामध्य़े मी काही क्लास न करता असच पाहून शिकली आहे. यात मी टाकाऊ कापडापासून टिकाऊ अशा काही गोष्टी शिवल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मी लहान
मुलीसाठी फ्रॉक, टोपडे, विविध प्रकारच्या बँग, मोबाईल कव्हर्स, मेकअप बॉक्स, ब्लाऊज फोल्डर, उश्याचे कव्हर्स असे शिवण शिवले. त्यातील काहीचे फोटो मी खाली
ठेवले आहेत.
पाककृती
विशेषतः मुले काही भाज्या आवडीने खात नाहीत म्हणून मी काही पाककृती केल्या, त्यात न आवडीच्या भाज्या घालून केलेला पदार्थ मुले आवडीने खातील व त्यांना
पोषणमूल्यदेखील मिळेल. मी मंच्युरियन, समोसा, पालक पुरी पाककृती केल्या आहेत. पण त्यातील एक पाककृती मी तुम्हाला सांगू इच्छिते
पालक पुरी
साहित्य
पालक १ जुड्डी, गव्हाचे पीठ, २ चमचे बेसन पीठ, २ चमचे ओवा, ५-६ हिरवी मिरची, ४-५ लसूण पाकळ्या, १ चमचा पांढरे तीळ, मीठ, तेल.
कृती
- एक जुड्डी पालक नीट निवडून स्वच्छ धुऊन, बारीक चिरणे.
- नंतर बारीक चिरलेला पालक १ ग्लास पाण्यात ५ मिनिटे वाफवून घेणे.
- थंड झाल्यावर वाफवलेला पालक मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
- त्या वाटण्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ, २ चमचे बेसन पीठ, २ चमचे ओवा, १ चमचा पांढरे तीळ, ५-६ हिरवी मिरची व ४-५ लसूण पाकळ्या वाटून केलेली
पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून २ चमचे तेलाचे मोहन घालून पीठ चांगले घट्ट मळणे.
- १५ मि. पीठ भिजवणे.
- नंतर गँस चालू करुन कढईत तळ्ण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवणे.
- नंतर मळलेल्या पीठाच्या मध्यम जाडीच्या पुरया लाटणे व तळणे.
- ह्या पुरया तुम्ही टोमँटो साँस किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकतात.
सजावट
सणावार आले की रांगोळी, मेंहदी काढली जाते.
रांगोळी
रांगोळी ही फुले-पाने वापरुन काढलेली असो संस्कार रांगोळी किंवा गालिचा.
मला रांगोळी काढण्यास खूप आवडते. त्यात रंगबेरंगी रंग भरणे. मी रांगोळी देवघर, बाहेरील आंगणात, तुळशीसमोर काढते. रांगोळी पाहून माझे मन प्रसन्न, सकारात्मक व
समाधानी होते.
मेंहदी
मेंहदी ही साधी Indian असो अगर Aerobic. मला दोन्हीही प्रकारच्या मेंहदी काढण्यास आवडते. मेंहदी काढताना मन एकाग्र होते.
मी काढलेल्या काही रांगोळीचे व मेंहदीचे फोटो बघण्यास ठेवले आहेत.
संपर्क
tejashreehojage at gmail dot com
लेखक: तेजश्री